आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्व देतो : प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने नाना पटोलेंचा अनुल्लेख!

ज्यांना जे करायचे त्यांनी ते करावे. कुणीच कुणाला बांधून ठेवले नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचे त्यांनी ते करावे. त्यावर आम्ही रोज उत्तरे का द्यावीत?, एच के पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत.

    नागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यानी लहान माणसावर मी कशाला बोलू, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाद्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे क्रमांक दोनचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील ‘आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असते, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी पटोले यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला आहे.

    जे करायचे त्यांनी ते करावे

    माध्यमांशी बोलताना पटेल म्हणाले की, ज्यांना जे करायचे त्यांनी ते करावे. कुणीच कुणाला बांधून ठेवले नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचे त्यांनी ते करावे. त्यावर आम्ही रोज उत्तरे का द्यावीत?, एच के पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असते. कारण ते थेट पक्षश्रेष्ठींचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात, असे पटेल म्हणाले.

    We value what HK Patil says Praful Patels statement refers to Nana Patole