अखेर कोरोनाच्या महालाटेला थोपविलेच; नागपुरात गुरुवारी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७६ वर

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येला आटोक्यात आणण्यात मोठे यश मिळाले आहे. शहरात गुरुवारी 264 रुग्णसंख्या, ग्रामीण भागात 208 आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या 4 इतकी नोंदविण्यात आली. महानगर पालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यातील वाढत जाणाऱ्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येला आटोक्यात आणण्यात मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी रुग्णसंख्या अवघी ४७६ वर स्थिरावली. यामध्ये शहरात गुरुवारी 264 रुग्णसंख्या, ग्रामीण भागात 208 आणि जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या 4 इतकी नोंदविण्यात आली. महानगर पालिका आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत.

    नागपूर जिल्ह्यात आज गुरुवारी कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील ८, ग्रामीण भागातील ४ आणि जिल्ह्याबाहेरील ४ कोरोना रुग्णांचा समावेश असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज १२९९१ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील १०८८३ रुग्ण आणि ग्रामीण भागातील २१०८ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या ११५१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७३ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या ९०७२ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ५२०२ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ३८७० रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.५५ लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ८८५४ इतकी असल्याचे गुरुवारी नोंदविण्यात आले.