पवार यांच्या वक्तव्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? ते समोर आले : माजी ऊर्जा मंत्री बावनकुळे यांचा घणाघाती आरोप

पवार साहेबांनी राज्य सरकारकडून याबाबत येत्या तीन महिन्यात 'इम्परिकल डाटा' तयार करण्याबाबत मंत्रिमंडळाची मंजूरी घेण्यास सांगावे. राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत 'इम्परिकल डाटा' तयार केला नाही तर आम्ही मंत्र्याना राज्यात फिरू देणार नाही.-- बावनकुळे, माजी ऊर्जा मंत्री

  नागपूर (Nagpur) : भाजपचे ओबीसी नेते (BJP OBC leader) आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (former minister Chandrasekhar Bavankule) यांनी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर टीका केली आहे.

  शरद पवार यांनीच जर केंद्र सरकारच्या राज्याना आरक्षण देण्याबाबत घटना दुरूस्तीवर ढकला करणारे वक्तव्य केले तर तो ओबीसी समाजावर (the OBC community) घोर अन्याय ठरेल, असे बावनकुळे म्हणाले. पवार यांच्या वक्तव्यामुळे झारीतील शुक्राचार्य (Shukracharya in Jhari) कोण आहेत ते समोर आले आहेअसेही ते म्हणाले.

  मंत्र्याना राज्यात फिरू देणार नाही
  पवार साहेबांनी राज्य सरकारकडून याबाबत येत्या तीन महिन्यात ‘इम्परिकल डाटा’ तयार करण्याबाबत मंत्रिमंडळाची मंजूरी घेण्यास सांगावे. त्यासाठी निधीची तरतूद करून डिसेंबरपर्यंत हा डेटा तयार करून न्यायालयात सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. बावनकुळे म्हणाले की, राज्य सरकारने डिसेंबरपर्यंत ‘इम्परिकल डाटा’ तयार केला नाहीतर आम्ही मंत्र्याना राज्यात फिरू देणार नाही.

  राज्य सरकारनेच ताट हिसकावले
  माध्यमांशी बोलताना माजी मंत्री बावनकुळे म्हणाले की, पवार साहेब म्हणाले की ताट वाढले आणि केंद्राने हात बांधले; मात्र हे ताट हिसकून घेण्याचे काम राज्य सरकारने केले. मात्र या सरकारचे प्रणेते असलेल्या पवार साहेबांनीच असे वक्तव्य केल्याने या विषयाचा फुटबॉल केला आहे. राज्य सरकारला केंद्राने अधिकार दिल्यानंतरही हे सरकार आता पुन्हा केंद्रावर आरोप करत आहे म्हणजे, ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा हा प्रकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

  पवार यांच्या वक्तव्यामुळे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत ते समोर आले आहे असेही बावनकुळे म्हणाले. मराठा आणि ओबीसी आरक्षणाची ढकला ढकली राज्य सरकारने बंद करावी आणि डाटा तयार करण्याचे काम सुरू करावे असे आवाहनही त्यानी केले.