प्रेयसीला ‘त्याने’ का बरं वीट मारून फेकली ? जाणून तुम्हालाही बसेल धक्का

दोघेही इमारतीत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि निर्दयी प्रियकराने तिला वीट मारून फेकली. तिचा जागीच मृत्यू झाला. आपला गुन्हा लपविण्यासाठी त्याने ती गच्चावरून खाली पडली असा बनाव केला.

    नागपूर (Nagpur).  दोघेही इमारतीत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि निर्दयी प्रियकराने तिला वीट मारून फेकली. तिचा जागीच मृत्यू झाला. आपला गुन्हा लपविण्यासाठी त्याने ती गच्चावरून खाली पडली असा बनाव केला; मात्र पोलिसांनी एका नजरेतच त्याला ओळखून टाकले. हिसका दाखविल्यानंतर त्याने हत्येसाठी जे कारण सांगितले ते कारण ऐकूण पोलिसांनाही धक्का बसला. उपराजधानीत घडलेल्या या हत्याकांडाने नागरिकही चक्रावून गेले आहेत.

    प्रेमी युगुलात झालेल्या वादानंतर प्रेयसीनं शारीरिक संबंध ठेवायला नकार दिल्यानं प्रियकराने तिची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर आरोपीनं पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी संबंधित महिला इमारतीवरून पडली असल्याचा बनाव रचला आहे. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. त्याच्या बोलण्यात विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी या हत्येचं रहस्य उलगडलं असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

    आरोपीचं नाव मोहम्मद जाविद मोहम्मद युसूफ शेख (वय-38) असं असून तो मध्यप्रदेशातील बैतूल येथील रहिवासी आहे. तर ३३ वर्षीय मृत प्रेयसीचं नाव सारिका शंकर पटेल असून ती सुदामनगरी अंबाझरी येथील रहिवासी आहे. आरोपीचं आणि मृत सारिका गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांचही लग्न झालं असून सारिका गेल्या तीन- चार वर्षांपासून आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती.

    आरोपी जाविदही आपल्या पत्नीला सोडून कामानिमित्त नागपूरात राहत होता. दरम्यान दोघांची ओळख होऊन गेल्या काही काळापासून दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तर आरोपी जाविद हा एका बांधकामाच्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करत होता.

    एका दैनिकात प्रकाशित वृत्तानुसार, 31 मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवन झाल्यानंतर दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर मृत सारिका तेथून रागाने इतर कामगारांसोबत गप्पा मारायला निघून गेली. त्यामुळे संतापलेल्या जाविदने पहिल्या मजल्यावरून तिला वीट फेकून मारली. यामुळे ती जागीच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान आरोपी जाविदने आरडाओरडा
    करत इतर कामागारांना मदतीसाठी बोलावलं आणि सारिका इमारतीवरून पडली असल्याचा बनाव रचला.

    घटना सीसीटीव्हीत कैद
    या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट येऊन पाहणी केली असता, अनेक गोष्टी संशयास्पद आढळल्या. तसेच आरोपी जाविदच्या बोलण्यामध्येही विसंगती आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेतला असता, आरोपी जाविद इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून विट फेकून मारताना निदर्शनास आला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी जाविदला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.