आल्याचे पीक घेऊन तरुण शेतकऱ्याने कमविले ६ लाख रुपये!

आल्याची बाजारभाव प्रति क्विंटल 14 हजार रुपये आहे. 1 एकरात 30 ते 40 क्विंटल पिके घेण्याची शक्यता आहे. मनोज यांच्या मते पीक विक्रीवर 5 ते 6 लाख रुपये मिळू शकतात.

  नागपूर.  आल्याची लागवड करून आपण कमी खर्चात मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतो.  शेतजमिनीच्या काही भागात जर मसाल्याची लागवड केली गेली तर शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात, असा शास्त्रज्ञांना विश्वास आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी खेड्यातील एका तरूण शेतकऱ्याने आल्याची शेती करण्याचा धोका पत्करला आहे. आल्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत – एक म्हणजे सुप्रभात, दुसरी सुरूचि आणि तिसरी सुरभी जी खूप चांगली मानली जाते. युवा शेतकरी मनोज डोंगरे यांनी आपल्या शेतात आल्याची लागवड करुन तरुण शेतकऱ्यांपुढे नवे उदाहरण ठेवले आहे. या शेतकऱ्याने आपल्या गावातील हवेत आल्याचा  सुगंध पसरविला आहे. मनोजने कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सिव्हिलमध्ये डिप्लोमा केला आणि कंत्राटी व्यवसाय स्विकारला. नोकरीबरोबरच ते पूर्वजांकडून प्राप्त शेती करतात. परंतु पारंपारिक शेती करताना अनेकदा नुकसान होते.

  मनोजने शेतीत काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला आणि शेतात आल्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातून 5 क्विंटल आल्याचे रोप आणून आपल्या शेतामध्ये 1 एकरवर लागवड केली. त्यांनी माहीम नावाचे आले लावले, त्यासाठी मोठे वाफे तयार केले  आहेत. आल्याच्या पिकासाठी सावली आवश्यक असते, म्हणून त्यांच्या दरम्यान मक्याची लागवड केली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात आले पीक तयार होते. आल्याची बाजारभाव प्रति क्विंटल 14 हजार रुपये आहे. 1 एकरात 30 ते 40 क्विंटल पिके घेण्याची शक्यता आहे. मनोज यांच्या मते पीक विक्रीवर 5 ते 6 लाख रुपये मिळू शकतात. आल्याशिवाय त्यांनी शेतात धान्य व हळद पिकेही घेतली आहेत. चिमूर तालुक्यामध्ये आल्याची लागवड करणारे ते पहिले तरुण शेतकरी ठरले आहे.

  जलवायु
  कृषि वैज्ञानिकांच्या मते आल्याची शेती करण्यासाठी उष्ण व आर्दता असलेले वातावरण गरजेचे आहे. 1500 ते 1800 मिलीमिटरपर्यंत वार्षीक पाऊस पडणाऱ्या भागात याचे मोठ्या प्रमाणात पीक घेता येते. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करावे. शेतामध्ये पाणी साचता कामा नये, याकडे विशेषकरून लक्ष द्यावे. कारण अधिक पाण्यामुळे पीक खराब होण्याची शक्यता वाढते.  रेताळ, लाल आणि चिकन मातीमध्ये आल्याचे पीक घेणे शक्य आहे. पीक वाढण्याच्या वेळी जवळपास 6-6.5 पीएच असलेली माती याकरिता अतियश फायदेशीर मानल्या जाते. मात्र दरवर्षी एकाच जमीनीवर आल्याची लागवड करू नये. कारण एकाच जागी वारंवार आल्याची लागवड केल्यास रोग आणि किडीमध्ये वाढ होते.

  शेतीची तयारी
  सर्वप्रथम शेतामध्ये योग्य प्रमाणात शेणखत किंवा कंपोस्ट टाकावे. आता देशी नांगराद्वारे 3 ते 3 वेळा नांगरणी करून शेताला समांतर बनवून घ्या. त्याचप्रमाणे शेताची छोट्या-छोट्या क्यारींमध्ये विभागणी करावी. शेवटच्या टप्प्यात खतांचा योग्य प्रमाणात वापर करावा.

  पिकाची कापणी
  आल्याचे पीक जवळपास 7 ते 8 महिन्यात कापणीयोग्य होते. जर पिकाचा वापर मसाले तयार करण्यासाठी करायचा असल्यास जवळपास 6 महिन्यानंतर कापणी करावी. जर पिकावर प्रक्रीया करून अन्य उत्पादन घ्यायचे असल्यास कापणी 8 महिन्यानंतर करावी. पिकाची पाने जेव्हा पिवळी होऊन पूर्णत: वाळून जाईल तेव्हा जमजावे की पीक कापणीयोग्य झाले आहे. यानंतर आल्याच्या गाठी जमीनीबाहेर काढून 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवावे. आता 2-3 दिवस सावलीमध्ये वाळत ठेवावे. आल्याचे उन्न आणि चांगले पीक घेण्याकरिता चांगले व्यवस्थापन करून 350 क्विंटलपर्यंत प्रति हेक्टर पीक घेणे शक्य आहे.