नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बँकेतील १४ कोटी हॅक; हुबळीतील तरुणीसह ३ परदेशी तरुणांना अटक

नांदेडच्या शंकर नागरी बँकेतील १४ कोटींवर हॅकर्सनी डल्ला मारला. या प्रकरणी हुबळीतील तरुणीसह ३ परदेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

नांदेड : नांदेडच्या शंकर नागरी बँकेतील १४ कोटींवर हॅकर्सनी डल्ला मारला. या प्रकरणी हुबळीतील तरुणीसह ३ परदेशी तरुणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

लाहोटी कॉम्प्लेक्समधील आयडीबीआय बँकेजवळ ही शंकर नागरी सहकारी बँक आहे. हॅकरने NEFT आणि RTGS द्वारे बँकेला चुना लावला. शंकर नागरी सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेत असलेल्या खात्यातून तब्बल साडे चौदा कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने लांबवले होते. २ जानेवारी रोजी हा सर्व प्रकार बँक व्यवस्थापनाच्या निदर्शनास आला.

यानंतर बँक व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर सायबर सेलने या प्ररकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी केनियातील दोन तर युगांडाच्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांना कर्नाटकातील धारवाड इथून ताब्यात घेण्यात आले. तर, हुबळी येथील एका तरुणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.