नांदेड जिल्ह्यात १२ जुलैपासून ८ दिवसांचा लॉकडाऊन लागू, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश

  • नांदेड जिल्हा १२ जुलै ते २० जुलैपर्यंत ८ दिवसांचा बंद पुकारला आहे. या बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सेवांना वगळले आहे. तसेच ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी घातल्या आहेत. शहरातील दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. तसेच लॉकडाऊनचे चोख बजवायला अधिक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. बंद दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.

नांदेड – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस जास्त वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्येही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी १२ जुलैपासून ते २० जूलैपर्यंत संपुर्ण नांदेड जिल्हाच्या सीमा बंद करण्यात येणार आहे. सर्वत्र संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.(8-day lockdown in Nanded district from July 12)

कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने २२ मार्च २०२० रोजीपासून देशभरात ६ टप्प्यांत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले होते. परंतु जुनच्या पहिल्या आठवड्यापासून लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे कोरोनाने रौद्ररुप धारण केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व जिल्ह्यांत लॉकडाऊन लागू केला आहे. 

नांदेड जिल्हा १२ जुलै ते २० जुलैपर्यंत ८ दिवसांचा बंद पुकारला आहे. या बंदच्या दरम्यान अत्यावश्यक सेवांना वगळले आहे. तसेच ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी घातल्या आहेत. शहरातील दुकानांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. तसेच लॉकडाऊनचे चोख बजवायला अधिक पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. बंद दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक आहे.