नांदेड-हिंगोली रोडवर अपघात; दुचाकीची धडकेत, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जगदीश केशवराव पतंगे , प्रशांत उर्फ सोनू विजय मुधोळ या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर राजेश दत्तराव पतंगे ,प्रदीप मारोतराव निर्मळ हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    आखाडा बाळापूर: नांदेड-हिंगोली रोडवर साळवा शिवारात रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. जगदीश केशवराव पतंगे (वय २६ वर्ष, राहणार घोडा), प्रशांत उर्फ सोनू विजय मुधोळ ( वय 24, राहणार आखाडा बाळापूर) या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर राजेश दत्तराव पतंगे (रा. घोडा ) ,प्रदीप मारोतराव निर्मळ (राहणार साळवा ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, जमादार फकीरा चव्हाण, सुखदेव जाधव, वाघमारे, खिल्लारे घटनास्थळी पोहोचले. मृत्यू झालेल्यांचे पार्थिव आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. आज त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.