ashok chavan

नांदेड : राज्यात काँग्रेसच्या महापालिकांना सरकारकडून निधी मिळत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विधानावरुन घूमजाव केले आहे. आपण असे काही म्हटेल नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले.

नांदेड : राज्यात काँग्रेसच्या महापालिकांना सरकारकडून निधी मिळत नाही, असे वक्तव्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण(ashok chavhan) यांनी विधानावरुन घूमजाव केले आहे. आपण असे काही म्हटेल नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना दिले.

परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी काँग्रेसच्या महापालिकांना सरकारचा निधी मिळत नाही, नांदेडलाही हा निधी मिळाला नव्हता, मात्र तो आपण आणून दिला, या आशयाचे विधान केले होते. त्यानंतर महाविकास आघाडीतील बिघाडी पुन्हा एकदा समोर आली होती. अशोक चव्हाणांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागल्यावर चव्हाणांनी घूमजाव केले आहे.

दरम्यान अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार म्हणाले की, अशोक चव्हाणांचे भाषण ऐकले नाही. काही काळापूर्वी निधी कमी मिळत होता, मात्र तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी बैठक घेऊन प्रश्न मिटवला होता. आता सर्वांना समान निधी मिळतो आहे. सरकारमध्ये कोणतीही कुरबूर नाही.

अशोक चव्हाणांच्या वक्तव्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नसल्याचे पुण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. हा विषय मंत्रिमंडळाचा आहे आणि तो मंत्रिमंडळातच सुटू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी या वादावर दिली.