मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये मूक मोर्चापूर्वीच आत्मदहनाचा प्रयत्न, छावाचे कार्यकर्ते ताब्यात!

छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांना या आंदोलनाची कल्पना असल्याने त्यांनी  हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

    नांदेड (Nanded) : छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये मराठा समाजाच्या (the Maratha community) मागण्यांसाठी शुक्रवारी मूक मोर्चा आंदोलन आहे. त्या पार्श्वभूमीवर छावा संघटनेने (the Chhawa) ठोक मोर्चाच्या भूमिकेचा आग्रह धरत आंदोलन केले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आता मूक आंदोलनाला काही अर्थ नाही, अशी भूमिका छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी मांडली आहे.

    या पार्श्वभूमीवर छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांना या आंदोलनाची कल्पना असल्याने त्यांनी  हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

    आंदोलकांचा पेट्रोलचा कॅन जप्त (Protesters seize petrol cans)
    यावेळी कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न करताच पोलिसांनी आंदोलकांजवळील पेट्रोलचा कॅन जप्त केला. तसेच छावाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलनाच्या वेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच मिशन, मराठा आरक्षण’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाबाबत मागणी केली. यावेळी पोलिसांनी छावाच्या कार्यकर्त्याना अटक करून वजीराबाद पोलीस ठाण्यात नेले.