शिवसेनेत मोठी खदखद; देवेंद्र फडणवीसांचा ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरून निशाणा

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या ऑडिओ क्लिपवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कदम यांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही. पण शिवसेनेत मोठी खदखद आहे हे निश्चित आहे.

    नांदेड : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी या ऑडिओ क्लिपवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. कदम यांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी मला माहीत नाही. पण शिवसेनेत मोठी खदखद आहे हे निश्चित आहे.

    मी काही त्यांच्या पक्षाचा नेता नाही. त्यामुळे त्या संदर्भात जी काही कारवाई करायची आहे, ते त्यांचा पक्षाचा नेता करेल, असे सांगतानाच शिवसेनेतील अनेक नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. तिथले अनेक लोक मला भेटत असतात. त्यांच्या मनातले काय ते सांगत असतात. त्यामुळे शिवसेनेत मोठी खदखद आहे, एवढे मात्र निश्चित, असे फडणवीस म्हणाले.

    कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाबाबत प्रसाद कर्वे यांनी आपली भूमिका मांडली आहे. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग नाही, मी कुणाचे रेकॉर्डिंग ठेवत नाही, ऑडिओ क्लिप संदर्भातील आवाज माझा नाही, असे कर्वे यांनी स्पष्ट केले. मी कुठलीही माहिती किरीट सोमय्यांना पुरवली नाही, किरीट सोमय्या आणि माझा संवाद नाही. सोमय्या यांनीच महावितरण आणि प्रांत कार्यालयात माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता, असे कर्वे म्हणाले. तर ऑडिओ क्लिप बेकायदेशीरपणे बाहेर काढल्या गेल्या, असा आरोपही कर्वे यांनी केला आहे. वैभव खेडेकर यांनी वैफल्यग्रस्ततेमुळे आरोप केले आहेत. मी रामदास कदम यांना 30 वर्षांपासून ओळखतो. मी मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब यांच्या विरोधात तक्रार केली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    स्वप्न पाहायला काही हरकत नाही. या महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे त्यांच्यात अडचणी निर्माण होत आहेत. या तीन पायाच्या सरकारमध्ये समन्वयचा अभाव आहेच, पण त्यामुळे जनतेला अडचणी निर्माण होत आहेत. हा एकप्रकारचा तमाशाच आहे.

    - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते