नांदेड जिल्ह्यात ढगफुटी ; शेकडो एकर जमीन पाण्याखाली

शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पाण्याखाली गेलेली जमीन खचली आहे, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,पोळ्या सारख्या सणाच्या वेळेस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत.

    नांदेड जिल्ह्यातील मांजरम परिसरात ढगफुटी झाली आहे ,सतत १२ तास पाऊस पडला आहे. सर्व शिवाराला नदीची रुप आले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पाण्याखाली गेलेली जमीन खचली आहे, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,पोळ्या सारख्या सणाच्या वेळेस निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत.

    आमची राज्यसरकारचा विनंती आहे, सर्व नियम अटी बाजूला सारून मदत घ्यावी, १०० टक्के पिक विमा व अतिवृष्टीची मदत तात्काळ शेतकर्‍याला द्यावी अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी दिली.