देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव; देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला

निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. भाजपने मोठा डाव टाकत शिवसेनेचा नेता फोडला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

  नांदेड : नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं होतं. यामुळे आता देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.

  दरम्यान या पार्श्वभूमीवर येथील राजकारण तापलं आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे. भाजपने मोठा डाव टाकत शिवसेनेचा नेता फोडला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

  साबणे यांना तिकीट देणार

  नाराज शिवसेना नेते सुभाष साबणे यांची देवेंद्र फडणवीसांनी गुप्त भेट घेतली. बिलोली देगलूर पोटनिवडणुक होत आहे. याच जागेवरुन भाजप आता साबणे यांना तिकीट देणार आहे. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रावण पाटील यांच्या घरी सुभाष साबणे पोहोचले आणि त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर भाजपने देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुभाष साबणे हे भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर केलं आहे. सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.

  साबणेंचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप

  अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. मी शिवसेनेवर नाराज नाही. परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये अशोक चव्हाण यांच्यामुळे शिवसेनेला धोका आहे. म्हणूनच शिवसेना वाढत नाहीय, असा आरोप साबणे यांनी केला आहे.