‘या’ कारणामुळे  आर्चीला कार्यक्रमाला आणणे आयोजकांना पडले महागात

महोत्सवाला रिंकू उपस्थित असल्याने तिला पाहण्यासाठी कार्यक्रम स्थळावर मोठी गर्दी झाली, महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी मास्क लावलेला नव्हता तसेच सोशल डिस्टंटचे पालनही केले नव्हते.

    नांदेड: कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनाकडून कोविड१९ चे निर्बध आधिक कडक केले जात आहेत. मात्र सरकाराने घालून दिलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम नागरिकांकडून केले जात आहे. नांदेड मधील सारखणी इथल्या लेंगी महोत्सवासाठी सैराट फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. महोत्सवाला रिंकू उपस्थित असल्याने तिला पाहण्यासाठी कार्यक्रम स्थळावर मोठी गर्दी झाली, महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांनी मास्क लावलेला नव्हता तसेच सोशल डिस्टंटचे पालनही केले नव्हते. यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत किनवट तालुका महसुल विभागाने सिंदखेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमुळे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असलेल्या सहा जणांवर कोरोना प्रतिबंध नियम आणि भांदवीच्या कलम १८८ , २६९, २७०, आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.