… तर खासदारकी सोडली असती : संभाजीराजे ; मराठा आरक्षणासाठीच्या मूक आंदोलनाला नांदेडमधून पुन्हा एकदा सुरुवात

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला संबोधित करताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीका केली ते म्हणाले, मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता.

    मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज नांदेडमधून सुरु झालेल्या मूक आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाची भूमिका मांडली. त्याचबरोबर आपण संसदेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला आणि त्यासाठी लढण्याची भूमिका मांडली, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठीचे पर्यायही सुचवले.

    यावेळी संभाजीराजेंनी संसदेत मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडतानाचे मत स्पष्ट केले. ते म्हणाले, “मी संसदेतही मराठा आरक्षणाविषयीची भूमिका मांडण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी मला बोलायची परवानगी दिली नाही. त्यावेळी मला कळलं की भांडल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे, आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे. पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली. त्या खासदारांचेही मी आभार मानतो.”

    अशोक चव्हाणांवर टीका

    संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला संबोधित करताना मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर खोचक टीका केली ते म्हणाले, मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी. पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत. ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले. काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत. संभाजीराजेंना भेटायला त्यांना वेळ नव्हता. पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.