नांदेडमध्ये बेकादेशीररित्या औषधविक्री; चौघांना बेड्या

बाजारात या इंजेक्शन मिळवण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

    नांदेड : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असतानाच नांदेडमध्येही रुग्णांमध्ये मोठी वाढ पहायला मिळत आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्याप्रमाणावर मागणी होत आहे.

    मात्र, बाजारात या इंजेक्शन मिळवण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

    पोलिस आणि एफडीएच्या संयुक्त पथकाने या तक्रारींवर कारवाई करत 4 जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 4 हजार रुपयांना उपलब्ध असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन मेडिकल स्टोअरमध्ये 8 हजार रुपयांना विकले जात होते.