नांदेड येथील क्युटिस बायोटेक या औषध कंपनीने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया विरोधात पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. सीरमने त्यांच्या लसीसाठी ‘कोव्हिशिल्ड’ या नावाचा वापर करु नये, यासाठी क्युटिस बायोटेकने हा खटला दाखल केला आहे.
नांदेड : कोरोना लशीची निर्मीती करणाऱ्या सीरम इन्स्टिटयूट विरोधात कोर्टात खटला दाखल झाला आहे. नांदेडच्या औषध कंपनीने सिरम विरोधात हा खटला भरला आहे. कोरोना लसीसाठी वापरण्यात आलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या नावावरुन हा खटला दाखल करण्यात आला आहे.
नांदेड येथील क्युटिस बायोटेक या औषध कंपनीने सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया विरोधात पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात खटला दाखल केला आहे. सीरमने त्यांच्या लसीसाठी ‘कोव्हिशिल्ड’ या नावाचा वापर करु नये, यासाठी क्युटिस बायोटेकने हा खटला दाखल केला आहे.
कोव्हिशिल्ड या नावाच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी आम्ही आधीच एप्रिल २०२० मध्ये अर्ज केला होता. ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने कंपनीने वेगवेगळया उत्पादनांची निर्मिती करुन, बाजारात त्यांची विक्री देखील केली असल्याचा दावा क्युटिस बायोटेकने केला आहे.
सीरमच्या आपत्कालीन वापरास सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे काही कोटी डोस बनून तयार आहेत. पुढच्या दहा दिवसात देशात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.