महाविकास आघाडीतील नेत्यांना मुंख्यमंत्री पदाचे वेध; जयंत पाटील यांच्यापाठोपाठ अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्री होण्याबाबत मोठे विधान

राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सध्या मुंख्यमंत्री पदाचे वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील मुख्यमंत्री होण्याबाबत मोठे विधान केले आहे.

नांदेड : राज्यात सध्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना सध्या मुंख्यमंत्री पदाचे वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देखील मुख्यमंत्री होण्याबाबत मोठे विधान केले आहे.

नांदेडमधील एका कार्यक्रमात जाहीरपणे त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल आपली इच्छाच बोलून दाखवली. ‘मला मुख्यमंत्री होण्याची घाई लागली नाही. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. त्यांच्याबरोबर आम्ही मनापासून साथ देत आहोत. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं उत्तम काम चालू असल्याचे सांगून आघाडीत मला बिघाडी करायची नाही असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री होण्याची घाई लागली असे म्हणत त्यांनी आपणही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्याचे अप्रत्यक्षपणे अधोरेखीत केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीही सुद्धा दोन दिवसांपूर्वी सांगलीमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली होती.