nanded

ईसापुर धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने धरणाचे पाणी सोडण्यात आले व सततच्या पडणाऱ्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने पुन्हा एकदा घेरल्याने, शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे.

नांदेड : हदगाव शहरासह तालुक्यात मागील दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस (heavy rain) पडत आहे. शनिवारी दुपारी दोन तास शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस पडल्याने (torrential rains), शहरातील मुख्य रस्ते व बस स्थानक परिसर जलमय झाला होता. या पावसाने शहरासह तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून, तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (losses to farmers )झाले आहे. शहरासह तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे.

ईसापुर धरणात पाण्याचा विसर्ग वाढल्याने धरणाचे पाणी सोडण्यात आले व सततच्या पडणाऱ्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने पुन्हा एकदा घेरल्याने, शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. पिकांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून, तात्काळ मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.