नांदेड कोरोनामुक्त; 271 गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एकूण 1604 गावांपैकी 1179 गावे कोरोनामुक्त झाली असून 271 गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोविड-19 चे 90000 पेक्षा अधिक बाधित आडळले असून 1800 लोकांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमधील 16 तालुक्यांमध्ये 1604 गावे आहेत. चार जून रोजी एकही बाधित आढळला नाही. याशिवाय दुसऱ्या लाटेत 271 गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    औरंगाबाद : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एकूण 1604 गावांपैकी 1179 गावे कोरोनामुक्त झाली असून 271 गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोविड-19 चे 90000 पेक्षा अधिक बाधित आडळले असून 1800 लोकांचा मृत्यू झाला आहे. नांदेडमधील 16 तालुक्यांमध्ये 1604 गावे आहेत. चार जून रोजी एकही बाधित आढळला नाही. याशिवाय दुसऱ्या लाटेत 271 गावांमध्ये एकही बाधित आढळला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

    जिल्हा परिषदेच्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी गावातील पंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आंगणवाडी कार्यकर्ता, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोना साखळी तोडण्यात यश मिळविले व गावकऱ्यांनीही सहकार्य दिले असे मत व्यक्त केले.

    दरम्यान, साथरोग संपुष्टात आला नसून गावकऱ्यांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहनही ठाकूर यांनी केले. ज्या 271 गावात कोरोनाबाधित आढळले नाही त्यापैकी 71 गावे आदिवासीबहुल किनवट तालुक्यातील आहेत. नयागाव तालुक्यानेही 100 टक्के लसीकरणाचे लक्ष्य प्राप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. भोकर तालुक्यातील भोसी गावातच रुग्णांवर उपचार करण्यात आले, असेही त्या म्हणाल्या.