नांदेड ते मुंबई विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड ते मुंबई विमानसेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिली आहे. विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

    नांदेड : नांदेड ते मुंबई विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजिनक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड ते मुंबई विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. परंतु त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडसोबतच जळगाव आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे.

    नांदेड ते मुंबई विमानसेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिली आहे. विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

    विमानाचं टाईमटेबल काय असणार ?

    मुंबईतून १ वाजून २५ मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल. तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर ७ वाजून ५ मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचणार आहे.