‘तुम्ही कितीही एकत्र आलात, तरी देखील आम्ही देगलूरची जागा जिंकणारच’ : चंद्रकांत पाटील

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाना साधला आहे. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे.

    नांदेड : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाना साधला आहे. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना डिवचले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही दगा दिला नाही. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या फक्त पाच जागा आल्या असत्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. नांदेडमधील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणूक संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

    चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

    आम्ही पंढरपूर जिंकले. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या.साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात २१ पैकी २१ जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आलात तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

    विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपा आणि शिवसेना युतीला निवडून दिलं. महाविकास आघाडीला निवडलं नाही. युती केली नसती तर भाजपाचे 144 आमदार निवडून आले असते, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.