कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नांदेडमधील भोसी गावाच्या पॅर्टनची पंतप्रधानाकडून दखल;   ‘या’ शब्दांत  केले कौतुक

कोरोना विषाणू फैलावाची साखळी तोडण्यासाठी या रुग्णांचे विलगीकरण करण्याचे ठरवले गेले. या पॉझिटिव्ह लोकांनी त्यांच्या शेतात १५ ते १७ दिवस राहावे यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले. ज्या पॉझिटिव्ह लोकांना शेत नव्हते त्यांची सोय भोसीकर यांच्या स्वत:च्या शेतात ४० बाय ६० फूट आकाराच्या तात्पुरत्या निवाऱ्यात (शेड) करण्यात आली. आशाताई या अंगणवाडी सेविका रोज शेतांना भेट द्यायच्या. १५ ते २० दिवसांच्या विलगीकरणानंतर ग्रामस्थांची पुन्हा आरोग्य तपासणी केली गेली व त्यानंतरच ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मोठी झळ ग्रामीण महारष्ट्रातील (Rural Maharashtra) ग्रामीण भागांनाही बसली आहे. राज्यातील प्रत्येक खेड्यामध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत असताना दिसत आहे. अनेक लक्षणे आढळूनही योग्यती खबरदारी न घेतल्याने कोरोना रुग्णावर उपचाराला उशीर झाल्याने मृत्यू झाले आहेत. मात्र या उलट काही गावांमध्ये ग्रामस्थानी पुढाकार घेत लक्षणे दिसताच प्रयत्न व जाणीवपूर्वक केलेल्या नियोजनामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आलेली पाहायला मिळत आहे.

    नांदेड (Nanded) जिल्ह्यातील अश्याच एका गावाने कोरोना काळात घेतलेली खबरदारी व माहामारीला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Prime Minister Narendra  Modi and the Union Ministry of Health) गावाचे कौतुक केले आहे. नांदेडमधील भोसी गावात दोन महिन्यापूर्वी लग्न समारंभानंतर भोसीतील मुलीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतरच्या आठवड्यात आणखी पाच रुग्ण आढळल्यानंतर गावात एकच गोंधळ व भीती निर्माण झाली. मात्र गावातच असलेल्या जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश देशमुख- भोसीकर यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या समन्वयातून आरोग्य शिबिरे घेण्यास तातडीने सुरुवात केली. लक्षणे दिसणाऱ्या नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट आणि आरटी-पीसीआर चाचण्यालया. यामध्ये जवळपास १९ लोक बाधित आढळले. त्यानंतर त्या रुग्णांसाठी व संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी व विलगीकरण करत स्वतः:च्या शेतात या संक्रमित लोकांची १५ ते १७ दिवस राहण्याची सोया केली. त्यासाठी शेतात तात्पुरत्या स्वरूपाच्या ४० बे ६० चा निवारा तयार करण्यात आला. गावातील आशासेविकांच्या मदतीने रुग्णाची चौकशी, आरोग्याच्या काळजी घेतली गेली. १५ ते २० दिवसांच्या विलगीकरणानंतर पुन्हा संक्रमितांची आरोग्य चाचणी करून अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच सर्व कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

    कोरोना विषाणू फैलावाची साखळी तोडण्यासाठी या रुग्णांचे विलगीकरण करण्याचे ठरवले गेले. या पॉझिटिव्ह लोकांनी त्यांच्या शेतात १५ ते १७ दिवस राहावे यासाठी त्यांचे मन वळवण्यात आले. ज्या पॉझिटिव्ह लोकांना शेत नव्हते त्यांची सोय भोसीकर यांच्या स्वत:च्या शेतात ४० बाय ६० फूट आकाराच्या तात्पुरत्या निवाऱ्यात (शेड) करण्यात आली. आशाताई या अंगणवाडी सेविका रोज शेतांना भेट द्यायच्या. १५ ते २० दिवसांच्या विलगीकरणानंतर ग्रामस्थांची पुन्हा आरोग्य तपासणी केली गेली व त्यानंतरच ते कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
    त्यांच्या याच कामाची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालय व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,’ग्रामीण भागात लोकांमध्ये कोविड-१९ बद्दल जागरूकता निर्माण करणे आणि पंचायत राज व्यवस्थांकडून सहकार्य मिळविणे, हे सारखेच महत्त्वाचे आहे.’ असे म्हणत भोसी गावाचे कौतुक केले.