ऑनलाईन दरोड्याची घटना : बँकेचा डेटा पुरवणारी टोळी पोलिसांच्या अटकेत

शंकर नागरी बँकेच्या ( Shankar Nagari Bank ) खात्यातील १४ कोटी ५० लाख रुपयांच्या या ऑनलाइन दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेचा महत्वपूर्ण गोपनीय डेटा हॅकर्सला कमिशनवर पुरविला गेला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नांदेड : नांदेड येथील आयडीबीआय (IDBI Bank)  बँकेत शंकर नागरी बँकेच्या खात्यातील जवळपास १४ कोटी रूपयांचा ऑनलाईन (Online ) दरोडा प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. शंकर नागरी बँकेच्या ( Shankar Nagari Bank ) खात्यातील १४ कोटी ५० लाख रुपयांच्या या ऑनलाइन दरोडा प्रकरणी बँकेशी संबंधित व्यक्तीकडूनच बँकेचा महत्वपूर्ण गोपनीय डेटा हॅकर्सला कमिशनवर पुरविला गेला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

बँकेच्या खात्यावरून RTGS व NEFT द्वारे १४ कोटी ५०लाख रुपयांचा ऑनलाईन दरोड्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी वाजीराबाद पोलिसांनी कर्नाटक राज्यातून दोन संशयित महिलांसह एका हॅकरला ताब्यात घेतले आहे. यातील एका महिलेचे नायजेरियन फ्रॉड करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान, दिल्लीच्या मोहनपूरा भागात नायजेरियन बहुल वस्तीतून हॅकिंगचे प्रकार होत असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.