Battle with Koronashi; Remadesevir, important information provided by the FDA on oxygen storage

सौम्य लक्षणे असली तरी भीतीपोटी अनेक जण रुग्णालये गाठत आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढून जवळपास दोनशेच्या जवळ गेली आहे. मात्र, या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसेवीर इंजेक्शन 31 मार्च व 1 एप्रिल रोजी शहरातील कुठल्याही औषधी दुकानात पुरेसे उपलब्ध नव्हते.

    नांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसह रेमडेसेवीर या इंजेक्शनची मागणीत सुद्धा वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांपैकी गंभीर रुग्णांना रेमडेसेवीर इन्जेक्शन अत्यावश्यक असते. मात्र दोन दिवसांपासून या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असल्याने रुग्णांचे नातेवाईक वणवण भटकत आहेत.

    एकीकडे शहरात कोरोना चाचणी केंद्रांमधून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जात आहे. त्यातही दररोज वाढणाऱ्या रुग्णांमध्ये ॲन्टीजेन किटद्वारे बाधीत रुग्णांचे प्रमाण खूप मोठे आहे.

    सौम्य लक्षणे असली तरी भीतीपोटी अनेक जण रुग्णालये गाठत आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढून जवळपास दोनशेच्या जवळ गेली आहे. मात्र, या रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रेमडेसेवीर इंजेक्शन 31 मार्च व 1 एप्रिल रोजी शहरातील कुठल्याही औषधी दुकानात पुरेसे उपलब्ध नव्हते.

    त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरश: वणवण हे दुकान, ते दुकान असे भटकत राहिले. काही जणांना तर गुरुवारी सायंकाळपर्यंतही इंजेक्शन उपलब्ध होऊ शकले नाही.