बायकोला सासरी पाठवत नाही म्हणून जावयाने सासूवर उगवला सूड, जातं डोक्यात घालून….

घरात कुणी नसताना जावई घरात आला आणि त्यानं दळण करायचं जातं डोक्यात घालून आपल्या सासूची निर्घृण हत्या (Son In Law Killed Mother In Law) केला आहे.

    नांदेड : पत्नीला नांदायला न पाठवल्यानं रागावलेल्या जावयानं आपल्या सासूला शिक्षा दिली आहे. घरात कुणी नसताना जावई घरात आला आणि त्यानं दळण करायचं जातं डोक्यात घालून आपल्या सासूची निर्घृण हत्या (Son In Law Killed Mother In Law) केला आहे. यानंतर आरोपी जावयानंदेखील गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट (Son in law suicide) केला आहे. एकाच दिवशी सासू आणि जावयाच्या मृत्यूनं गावात एकच खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    ही घटना नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर याठिकाणी घडली आहे. आरोपी जावयानं चार जुलै रोजी घरात कुणी नसताना आपल्या सासूच्या डोक्यात जातं घालून तिची निर्घृण हत्या केली आहे. मालिनी बाहेकर असं हत्या झालेल्या सासूचं नाव आहे. तर श्रीकांत पाडदेवाड असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या जावयाचं नाव आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून सासूबाई पत्नीला नांदायला पाठवत नाही, हा राग मनात धरून त्यानं आपल्या सासूची हत्या केली आहे.

    तरोडा भागातील भावसारनगर परिसरातील रहिवासी असणाऱ्या मृत मालिनी बाहेकर यांची मुलगी मोहिनीचा सहा वर्षांपूर्वी श्रीकांत शंकरराव पाडदेवाड याच्यासोबत आंतरजातीय विवाह झाला होता. मोहिनी या लातूरमधील एका खाजगी बँकेत नोकरीला होत्या. मृत श्रीकांत हा लातूरमधील एका हॉटेलमध्ये वॉर्डन म्हणून काम करत होता. पण लॉकडाऊनमुळे श्रीकांतची नोकरी गेली होती. नोकरी गेल्यानं अस्वस्थ झालेल्या श्रीकांतला दारुचं व्यसन लागलं.

    दारुच्या व्यसनामुळे श्रीकांतचं त्याची पत्नी मोहिनीसोबत सतत वाद होऊ लागला. यामुळे संतापाच्या भरात पत्नी मोहिनी माहेरी निघून आली. यानंतर जावई श्रीकांतनं पत्नीला माघारी घेऊन आणण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण सासू मुलीला नांदवायला परत पाठवायला तयार झाली नाही. अनेक विनवण्या करूनही सासूनं जावयाचं ऐकलं नाही. हाच राग मनात धरून श्रीकांतनं घरात कुणी नसताना सासूच्या डोक्यात दगडी जाते घालून निर्घृण हत्या केली. तसेच स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली आहे. मंगळवारी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.