hallabol miravnuk

दसऱ्यानिमित्त दरवर्षी हल्लाबोल मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. पण यंदा कोरोनाच्या संकटामुळे काही ठरावीक लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र यावेळी मोठी गर्दी जमल्याचे उघड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या नियमांची नांदेड गुरुद्वारा कमिटीकडून पायमल्ली करण्यात आली आहे.

नांदेड : दसऱ्यानिमित्त काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सूचनांचे गुरुद्वारा कमिटीकडून उल्लंघन करण्यात आले. कोरोनाचे सगळे नियम नांदेड गुरुद्वारा कमिटीनं धाब्यावर बसवले आहेत. नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.