खलिस्तानी चळवळीच्या समर्थकाला ‘या’ ठिकाणाहून अटक

पंजाब सीआयडीनं सरबजीत कीरतच लोकेशन शोधून काढलं आणि याची माहिती नांदेड पोलिसांना दिली, या माहितीच्या आधारे नांदेड पोलिसांनी कीरतला अटक केली. अटकेनंतर आता कीरतला पंजाबकडे नेण्यात येत आहे.

    नांदेड: पंजाब गुन्हे अन्वेषण शाखा आणि महाराष्ट्रातील पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सरबजीत कीरत नावाच्या एका खलिस्तानी चळवळीच्या समर्थकाला नांदेडमधून अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये पंजाब पोलिसांना तो हवा होता. पंजाब सीआयडीनं याचं लोकेशन शोधून काढलं आणि याची माहिती नांदेड पोलिसांना दिली, या माहितीच्या आधारे नांदेड पोलिसांनी कीरतला अटक केली. अटकेनंतर आता कीरतला पंजाबकडे नेण्यात येत आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, प्रक्षोभक भाषणं आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचे त्याच्यावर आरोप आहेत.