महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

नांदेड (Nanded) : मंदिरं खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. विद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नाही. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या 'त्या' पत्रावर अमित शहा नाराज झाले आहे.

नांदेड (Nanded) : मंदिरं खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहिणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. विद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नाही. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवलेल्या ‘त्या’ पत्रावर अमित शहा नाराज झाले आहे.

राज्यपालांच्या पत्रात नेमकं काय?
भगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना रामभक्तीची आठवण करून दिली. ‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती,’ असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?, असाही प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

 धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री
राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. एकीकडे राज्यात बार, रेस्टॉरंट आणि समुद्र किनारे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, दुसरीकडे देव-देवता मात्र लॉकडाऊनमध्ये अडकून पडले आहेत. मागच्या तीन महिन्यात विविध शिष्टमंडळांनी माझ्याकडे प्रार्थनास्थळे उघडण्याची मागणी केली. यात धार्मिक नेते, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे. दिल्लीत ८ जूनला मंदिरे उघडण्याचा निर्णय झाला. त्याच सुमारास देशभरात मंदिरे उघडली गेली. मात्र, त्यामुळे कुठे कोरोनाची लाट आल्याचे चित्र नाही. त्यामुळे आवश्यक काळजी घेत सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले.

संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे….
पत्राच्या सुरुवातीलाच ठाकरे यांना उद्देशून राज्यपाल म्हणतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही सोशल मीडियावरुन नागरिकांशी संवाद साधताना मिशन बिगीन अंतर्गत पुनश्च हरिओमची घोषणा केली होती. याच भाषणात तुम्ही लॉकडाऊन शब्द कचऱ्याच्या डब्यात टाकण्याची लोकप्रिय घोषणाही केली होती. लॉकडाऊनमुळे त्रासलेल्या नागरिकांना तुमच्या या शब्दांनी आशेचा किरण दिसला होता. परंतु या सार्वजनिकरित्या तुम्ही केलेल्या या घोषणेच्या चार महिन्यांनंतरही दुर्दैवाने राज्यातील प्रार्थनास्थळे सुरु होऊ शकली नाहीत.

११ ऑक्टोबर रोजी सार्वजनिकरित्या बोलताना तुम्ही मंदिराचं लॉकडाऊन पुढे वाढवत असल्याची घोषणा केली. एकीकडे तुम्ही बार, रेस्टॉरंट आणि बीचेस सुरु केले आणि त्याचवेळी दुसरीकडे आपल्या देवी देवतांना टाळेबंद करुन ठेवले. गेल्या तीन महिन्यात मंदिरं सुरु करावी ही मागणी घेऊन अनेक शिष्टमंडळे मला भेटायला आली. यात धार्मिक नेते, सामाजिक संस्था आणि राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश होता, असे राज्यपालांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही!
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पत्राला उत्तर दिले. तसेच महाराष्ट्राला अथवा राज्याच्या राजधानीला, पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत-खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही, असा सणसणीत टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.