
गाढविणीच्या दुधात औषधी गुणधर्म असतात असे काहींचे मत आहे. तर या दुधाचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, कफ आणि निमोनिया असे आजार बरे होतात. लहान मुलांना असे आजार होऊ नयेत यासाठी त्यांना गाढविणीचे दुध पाजायचे.
नांदेड : देशात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार घातला आहे. त्यामुळे कोरोना काळापासून दूध व्यवसायावर मोठा परिणाम झाला आङे. तरीदेखील उमरगामध्ये मागील काही दिवसांपासून काही दूध व्यावसायिक दूध विकताना दिसत आहेत. ते १०० रुपये मिलीलीटर (price of milk) तर त्यांच्याकडील काही औषधी मिसळल्यास ते दूध १५० रुपये लीटर या भावाने विकत आहेत. या दुधात औषधी गुणधर्म असल्याचे ते सांगत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक लोक दुध खरेदी करत आहेत.
गाढविणीच्या दुधात (donkey’s milk) औषधी गुणधर्म असतात असे काहींचे मत आहे. तर या दुधाचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, कफ आणि निमोनिया असे आजार बरे होतात. लहान मुलांना असे आजार होऊ नयेत यासाठी त्यांना गाढविणीचे दुध पाजायचे. दुधाचे सेवन केल्यास आजारावर मात करणारी प्रतिकार शक्ती वाढते असे दुध व्यावसायिकांचे म्हणणे आहे. उमरगा शहरात असे किमान २० दूग्ध व्यवसायिक दाखल झाले आहेत. गाढविणीचे अधिक दूध काढता येत नाही. त्यामुळे प्रत्येकी किमान दीड ते दोन हजार रूपयांचा व्यवसाय होत आहे. शंभर रूपयांना दहा ते पंधरा मिलीलिटर या दराने दूध विकले जात आहे. त्यात त्यांची औषधी घातल्यास तेच दूध दीडशे रूपयाला विक्री होत आहे.
अनेक वर्षांपासून हे व्यावसायिक या दुधाचा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर महाराष्ट्रातील अनेक भागात ते दुधाचा व्यवसाय करतात. औषधी गुणधर्म असल्यामुळे नागरिक गाढविणीचे दुध खरेदी करत आहेत. तसेच या व्यावसायिकांचा हा परंपरागत व्यवसाय असल्यामुळे हेच त्यांच्या जिवनाचे साधण असल्याचे व्यावसायिकेने सांगितले आहे. आजार होऊ नये यासाठी हे गाढविणीचे दुध लहान मुलांना पाजले जाते.