Lockdown caused job loss; Decided to get better

10 कोटी रुपये द्या नाही तर, नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय आणि इतर महत्वाची कार्यालय बॉम्बने उडवून देईन, असे लिहिलेला ईमेल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आयडीवर आल्याने एकच खळबळ उडाली.

    नांदेड : 10 कोटी रुपये द्या नाही तर, नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय आणि इतर महत्वाची कार्यालय बॉम्बने उडवून देईन, असे लिहिलेला ईमेल नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आयडीवर आल्याने एकच खळबळ उडाली.

    दरम्यान, धमकीचा मेल पाठवणाऱ्याला नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी देत त्यासोबतच जिल्ह्यातील सर्व कार्यालयांची लिस्ट जोडत या आरोपीने मेल केला होता.

    या ई मेलमध्ये दरमहा 5 कोटी रुपये सुरक्षा कर देण्यासाठी मेसेज लिहिलेला होता. त्याचप्रमाणे हॉटस्पॉटची क्षमता 1 किलोमीटर लिहिलेली होती. तसेच मेल करणाऱ्या इसमाने दरमहा 5 कोटी रुपये सुरक्षा कर येत राहील तोपर्यंत सर्वकाही गुप्त राहील असेही लिहिले होते.