नांदेडमध्ये थरार; भरदिवसा भरचौकात तरुणावर गोळीबार

एका चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे मोटारसायकलवर गावात येऊन भरचौकात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. मात्र, तरुणाचा गोळीबारात मृत्यू न झाल्यामुळे त्याच ठिकाणाहून त्यास किडनॅप केले व गोळीबार व तलवारीने वार करून त्यास ठार केले.

    नांदेड : एका चित्रपटाच्या दृश्याप्रमाणे मोटारसायकलवर गावात येऊन भरचौकात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. मात्र, तरुणाचा गोळीबारात मृत्यू न झाल्यामुळे त्याच ठिकाणाहून त्यास किडनॅप केले व गोळीबार व तलवारीने वार करून त्यास ठार केले.

    तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह इजळी शिवारात फेकून दिल्याची घटना मुदखेड तालुक्यातील निवघा येथे घडली. देविदास उर्फ गुरू पवार, असे मृत तरुणाचे नाव आहे.

    मुदखेड तालुक्यातील निवघा येथील देविदास पवार हा गावातील शिवाजी पुतळा परिसरात असताना दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात मारेकऱ्यांनी देविदासवर गोळीबार केला. त्यानंतर जखमी अवस्थेत तरुणास मोटार सायकलवर इजळी शिवारात घेवून गेल्यानंतर त्या ठिकाणी तरुणावर दोन गोळ्या झाडून तलवारीने वार केले. या घटनेत देविदास पवार घटनास्थळी गतप्राण झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले.