चौथीचे विद्यार्थीही दारुच्या आहारी, देशी दारुचं दुकान बंद करण्यासाठी महिलांचं ठिय्या आंदोलन

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावात देशी दारुच्या (Liquor Shop) दुकानामुळे गावात मद्यापींचा त्रास वाढला आहे. दारु दुकानामुळे सुरुवातीला पुरुषवर्ग मद्यपी आणि व्यसनाधीन झाला. परंतु आता चौथीच्या (Students Also Drink) वर्गात शिकणारे मुले दहा-दहा रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या दारु पीत असल्याचे चित्र आहे.

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातील चौथीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थ्यी (Students Also Drink) दारू पिऊन गावात धिंगाणा घालत आहे. या घटनांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी  नायगाव धरण इथलं देशी दारुचं दुकान बंद करण्याची (Women’s Agitation) मागणी करत धर्माबादच्या तहसील कार्यालायासमोर ठिय्या मांडला.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण गावात देशी दारुच्या दुकानामुळे गावात मद्यापींचा त्रास वाढला आहे. दारु दुकानामुळे सुरुवातीला पुरुषवर्ग मद्यपी आणि व्यसनाधीन झाला. परंतु आता चौथीच्या वर्गात शिकणारे मुले दहा-दहा रुपये जमवून एकत्र येत दिवसाढवळ्या दारु पीत असल्याचे चित्र आहे.

धर्माबाद तालुक्यातील नायगाव धरण हे गाव तेलंगाणा राज्यालगत आहे. या गावात तेलंगणापेक्षा दारु स्वस्त मिळते. त्यामुळे या गावात तेलंगणातील लोकांची सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत ये-जा राजरोस सुरु असते. शिवाय गावातील बहुतांश पुरुष मंडळी मद्यपी बनले. आता त्यात चौथीच्या वर्गात शिकणारी कोवळी मुलेही दारुच्या आहारी गेल्याचं चित्र आहे.