jeep collapsed

तोरणमाळ घाटात जीप दरीत(toranmal accident) कोसळून अपघात (accident)झाला आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नंदुरबार : तोरणमाळ घाटात जीप दरीत(toranmal accident) कोसळून अपघात (accident)झाला आहे. यात सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच २० जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप ७० फूट खोल दरीत कोसळली आहे. यात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीपमध्ये ३१ जण असल्याची माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र -मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, मजुर घेऊन जाणारी जीप ७०-८० फूट खोल दरीत कोसळल्याने मजुरांचे प्रेत झाडात दगडावर जोरदार आदळल्याने मृत्यू झाला. यात लहान मुलीचा देखील समावेश आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रवाशी जीप खोल दरीत कोसळल्याने प्रवाश्यांचा शोध सुरू आहे.अपघात इतका भीषण झाला आहे की प्रवाशी जीपचे सर्व भाग दरीत अस्तव्यस्त पडलेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हसावद पोलीस घटना स्थली दाखल झाले.आजूबाजूचे ग्रामस्थ घटनास्थळी मदत करीत आहे. दरीतून मजुरांचे प्रेत काढण्यासाठी अवघड जात आहे. जखमींना मिळेल त्या साधनाने रूग्णालयात नेण्यात येत आहे.

मृतांची नावे – चिम्मा नाईक(वय -३५ वर्षे), बायजीबाई नाईक(वय-३८ वर्षे), कुचालीबाई नाईक(वय -१८वर्षे), रिमोबाई नाईक(९वर्षे), सेकडीबाई नाईक(४५वर्षे), रिंगाटीबाई नाईक(वय २५ वर्षे)