शहाद्यात राष्ट्रीय सुरक्षा मंचातर्फे चिनी वस्तू व चीनच्या  राष्ट्राध्यक्षाच्या पुतळाचे दहन

शहादा : राष्ट्रीय सुरक्षा मंच शहादा यांचेतर्फे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता शहादा नगरपालिके समोरील चौकात गलवान घाटीमध्ये चिनी सैनीकांशी लढतांना शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली तसेच चिनचे राष्ट्राध्यक्ष पुतळ्याचे व वस्तूंचे दहन कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सुरक्षा मंचाचे प्रमुख डॉ. वसंत अशोक पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की,हा कार्यक्रम दोन भागांमध्ये विभागून केला.

 शहादा :  राष्ट्रीय सुरक्षा मंच शहादा यांचेतर्फे आमदार राजेश पाडवी यांच्या उपस्थितीत  आज सकाळी ११ वाजता शहादा नगरपालिके समोरील चौकात गलवान घाटीमध्ये चिनी सैनीकांशी लढतांना शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली तसेच चिनचे राष्ट्राध्यक्ष पुतळ्याचे व वस्तूंचे दहन कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय सुरक्षा मंचाचे प्रमुख डॉ. वसंत अशोक पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की,हा कार्यक्रम दोन भागांमध्ये विभागून केला.

एका भागामध्ये शहरातील नागरिकांना रिक्षावर ध्वनिक्षेपकावरुन  सकाळी अकरा वाजता सर्व नागरिकांनी सायरन वाजल्यावर आहे त्या ठिकाणी दोन मिनिटे माैन उभे राहून विरगती प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करावी याबाबत माहिती दिली . दुस-या भागात प्रातिनिधिक स्वरूपात नगरपालिका समोरील चौकात शहरातील मान्यवर सर्व समाजाचे प्रतिनिधींना आमंत्रित केले.
  कोरोना सावटामुळे  फक्त मर्यादित ४० व्यक्ती  एकत्रित आले. चौकातील या कार्यक्रमात संघ स्वयंसेवक कार्यकर्ते अजय शर्मां यांनी  सर्वाना आवाहन केले की, सैन्याचे  मनोबल वाढवण्यासाठी आपण सर्वांनी सरकार बरोबर तसेच सैन्याबरोबर सर्व भेद विसरून उभे राहण्याची गरज आहे. त्याच प्रमाणे समाजामध्ये आपला आताचा भारत आणि जे शीर्षस्थ देशाचे नेतृत्व आहे ते मजबूत आहे, दमदार आहे.कुठल्याही स्थितीमध्ये आपण लढाईमध्ये चिन पेक्षा कमी नाही ही मानसिकता आपल्या सगळ्यांची असली पाहिजे असे सांगितले. त्यानंतर आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थितांना  चिनी वस्तूंचा बहिष्कार करू, चीनी वस्तू वापरणार नाही, विकणार नाही अशी प्रतिज्ञा दिली.नंतर चिनी वस्तू,चिनच्या  राष्ट्रध्यक्षांचा पुतळ्याचं दहन करण्यात आलं. सकाळी ठिक अकरा वाजता न.पा.  सायरन वाजल्यावर उपस्थित मान्यवरांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली . राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपन्न झाला.
 या कार्यक्रमांमध्ये आमदार राजेश पाडवी,नगराध्यक्ष मोतीलाल तात्या पाटील,सा.ता.प.सहकारी साखर कारखाना चेअरमन दीपक बापू पाटील,मार्केट कमिटीचे सभापती सुनील पाटील,महावीर पतपेढी चेअरमन रमे़श जैन,जहीर शेख,अल्ताफ मेमन, डॉ. कांतिलाल टाटिया,विनाेद साेनार,पंकज साेनार,डॉ. दर्शन कुलकर्णी,डॉ. चंद्रकांत पाटील,अब्बास नुरानी ,भगवानदास अग्रवालमनीष चौधरी,भाजपचे अतुल जयस्वाल, विनोद जैन,जयेश देसाई, जमादार,पु.साने गुरुजी विद्या प्रसारकचे  समन्वयक  मकरंद भाई पटेल,ज्ञानेश्वर  चाैधरी,जी.प.सदस्य सभापती अभीजीत पाटील,संमित्र क्रीड़ा मंडळाचेअध्यक्ष ज्ञानी  कुलकर्णी आणि अनेक सन्माननीय नागरीक ,नगरसेवक उपस्थित होते. 
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सुरक्षा मंच कार्यकारिणीचे सदस्य समीर जैन,भरत अग्रवाल, राहुल चौधरी,अधिवक्ता प्रितेश जैन,संजय कासाेदेकर, राजा साळी, राजेंद्र पानपाटील,दीनेश खंडेलवाल, त़सेच संघाचे तालुका संघचालक डॉक्टर हेमंत सोनार आणि स्वयंसेवक कार्यकर्ते बबलु परदेशी,दिनेश काेळी,गणेश धाकड,शिवम, संकेत,गाैरव,कुणाल,ईशान,गुंजन,पीयुष यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम  घेतले.