सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

  • ऑनलाइन स्पर्धेत शहादा शहरातील प्राथमिक शाळा व शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील एकुण १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्या स्पर्धेचा निकाल ही ऑनलाईन दिपकबापु पाटील व मकरंद पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन जाहीर करण्यात आला. वकृत्व स्पर्धेतील स्पर्धकांनां सन्मानचिन्हं व प्रमाणपत्र देवून मान्यवरांतर्फे गौरविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी केली.

मामाचे मोहिदे  : लोकमान्य टिळकांचा आदर्श, आचार,विचार,देशासाठी केलेले योगदान आजच्या विद्यार्थ्यांना स्फुर्ती दायक आहे. टिळकांचे चरित्र वाचावे व तसे आचरण करावे. असे प्रतिपादन सातपुडा सह कारखानाचे चेअरमन दिपकबापु पाटील यांनी केले. येथील सन्मित्र बहुउद्देशिय क्रीडा मंडळातर्फे लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी निमीत्ताने वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. प्रारंभी लो. टिळकांच्या प्रतिमेला दिपकबापु पाटील यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. 

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमीत्ताने मान्यवरांतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी न.पा.गट नेते व नंदुरबार  जिल्हा भा.ज.पा. चे उपाध्यक्ष मकरंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सुनील पाटील,  ईश्वर पाटील, छोटूभाई पाटील, विनोद जैन, सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी, सचिव प्रतिभा बोरसे, संचालक समीर जैन, आर.टी पटेल, मुख्या. ताराबाई बेलदार, संजय भोई, डॉ पुष्कर शास्त्री ,पुष्पा पाटील इ. उपस्थित होते. सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी पुण्यतिथी निमीत्ताने ऑनलाईन  वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती.

ऑनलाइन स्पर्धेत शहादा शहरातील प्राथमिक  शाळा व शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक  शाळेतील  एकुण १४५  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्या स्पर्धेचा निकाल ही ऑनलाईन दिपकबापु पाटील व मकरंद पाटील यांच्या हस्ते ऑनलाइन जाहीर करण्यात आला. वकृत्व स्पर्धेतील स्पर्धकांनां सन्मानचिन्हं व प्रमाणपत्र देवून मान्यवरांतर्फे गौरविण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी केली. सुत्रसंचालन प्रा आर टी पटेल यांनी केले. स्पर्धेचे संकलन व आभार प्रदर्शन  प्रतिभा बोरसे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.नगीन पाटील, विजय देशपांडे यांनी काम पाहिले.  स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात कोरोना प्रतिबंध नियमाचे पालन करण्यात आले. 

सन्मित्र बहुउद्देशिय क्रीडा मंडळातर्फे लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दीचा प्रारंभाच्या निमीत्ताने ऑनलाइन वकृत्व स्पर्धा आयोजित केली होती. वकृत्व स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. वकृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देताना दिपकबापु पाटील, सुनिल पाटील, मंकरद पाटील, ज्ञानी कुलकर्णी, आर टी पटेल, छोटूभाई पाटील, ताराबाई बेलदार, प्रतिभा बोरसे, पुष्पा पाटील उपस्थितीत होते.