मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक नंदुरबार दौऱा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी आणि धडगाव अक्राणी या दोन ठिकाणी भेट देणार आहेत.आज १८ मार्च किंवा १९ मार्च रोजी त्यांचा हा संभावित दौरा आहे.

    नंदुरबार : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार असून अचानक होणाऱ्या या दौऱ्यामुळे यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी आणि धडगाव अक्राणी या दोन ठिकाणी भेट देणार आहेत.आज १८ मार्च  किंवा १९ मार्च  रोजी त्यांचा हा संभावित दौरा आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी धावपळ करून अतिदुर्गम भागातील मोलगी येथे भेट देऊन पाहणी केली. तातडीने बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने येणार असल्यामुळे हेलिपॅड ची तयारी सुरू करण्यात आली. मोलगी आणि धडगाव येथील कोविड सेंटरच्या ऊद्घाटनासाठी तसेच दूर्गम भागातील लसीकरण आदी आरोग्यविषयक शुभारंभासाठी हा धावता दौरा असल्याचे समजते. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्या विषयी बहुतांश स्तरावर अनभिज्ञता दिसून आली. दौरा नेमका कशासाठी याचा उलगडा कार्यकर्त्यांना झाला नाही.