नंदुरबारमध्ये शहादा तालुक्यात २५ जणांवर कोरोनाचे उपाचार

 शहादा – नंदुबारमध्ये शहादा तालुक्यात २५ जणांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले आहेत. शहरातील ७० वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या वृद्धावर उपचार करण्यासाठी नंदुरबारमधील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तालुक्यात ५० कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, १५ रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात, तर १० जणांवर जिल्ह्याबाहेरील रूग्णालयात उपाचर सुरू आहेत.

परंतु दोन महिन्यानंतर शहरात रूग्ण आढळून आल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मात्र प्रशासनाने येथील परिसरात अलर्ट जारी करून, नागरिकांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.

तसेच सद्य़स्थितीत १५ जणांवर कोरोनाचे उपचार चालू असून, यात शहरातील आठ आणि ग्रामीण भागातील सात रूग्णांची समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.