Devendra Fadnavis आणि Jayant Patil एकाच गाडीने कार्यक्रमाला दाखल, चर्चांना उधाण

नंदुरबारमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले. आणि 'भावी सहकारी'च्या पुढच्या अध्यायाच्या चर्चांना सुरुवात झाली.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे CM Uddhav Thackeray यांच्या मराठवाड्यातील ‘आजी, माजी, भावी सहकारी’ वाल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विवीध चर्चांना सुरुवात झाली. काल शुक्रवारचा पुर्ण दिवस मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा माध्यमांनी किस काढला. आता याचा पुढचा अध्याय नंदुरबारमध्ये सुरु असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आणि त्याला कारण ठरलेय देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis आणि जयंत पाटील Jayant Patil यांची भेट.

    नंदुरबारमध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले. आणि भावी सहकारीच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात झाली.

    दहशतवादी लोकल ट्रेनमध्ये विषारी गॅस हल्ला करण्याची शक्यता, पोलिस यंत्रणा अलर्ट

    कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी पेपर प्लँट आणि आदिवासी बांधवांना सोबत घेऊन स्टार्च फॅक्टरी काढली होती. त्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती. म्हणूनच त्यांना सहकारमहर्षी म्हणून खान्देशात ओळखले जाते.

    याच सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले आणि पुन्हा एकदा ‘भावी सहकारी’ची ठिणगी पडली.

    दरम्यान, या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याता प्रयत्न केला आहे.

    वाढता पॉझिटिव्हिटी रेट लक्षात घेता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या चाचण्या वाढवण्याच्या सुचना