नंदुरबारमध्ये भुकंपाचे धक्‍के; मध्यप्रदेशात केंद्रबिंदू

मध्यप्रदेश राज्यातील खेतिया गावाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्क्यामुळे तालुक्यात कुठेही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी ग्रामीण भागात भूकंपाच्या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे.

नंदूरबार : नंदूरबार जिल्यातील शहादा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. भूकंपाचे केंद्र शहरापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर असल्याचे समजते. ग्रामीण भागात भूकंपाच्या चर्चेला उधाण आले आहे.

शहरासह तालुक्यातील वडाळी, मंदाना, कहाटूळ आदी मंडळातील गावांसह अन्य काही गावात शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्‍के जाणवले. सावळदा (ता.शहादा) येथील भूकंपमापन केंद्रात या भूकंपाची तीव्रता ३.२ रिस्टर स्केल इतकी नोंद झाली.

मध्यप्रदेश राज्यातील खेतिया गावाजवळ या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. या धक्क्यामुळे तालुक्यात कुठेही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी ग्रामीण भागात भूकंपाच्या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शहादयाचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी ग्रामीण भागात पाहणी पाहणी करून ग्रामस्थांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.