Coronavirus patients get fungal infections, eyes, nose and jaw fail

फंगल इन्फेक्शनचे पेशंट रोज वाढत असतांनाच त्यावर रामबाण उपाय ठरलेले अँम्फूटेरीसीन इंजेक्शन मात्र मोजक्या स्वरुपातच उपलब्ध आहे. या इंजेक्‍शनचा पूर्ण नाशिक विभागात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने रेमडेसिविर प्रमाणेच अँम्फूटेरीसीन ईन्जेक्शनचा बाजार तापणार; असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटू लागला आहे. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने रेमदेसिविर प्रमाणेच या इंजेक्शनची सुद्धा पर्यायी सोय तातडीने करणे तसेच त्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून औषध विक्रेत्यांना आतापासूनच त्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता ठेवण्याविषयी सूचना देणे आवश्यक बनले आहे. डायबिटीस असलेल्या सगळ्या कोविड रुग्णांनी फंगल इन्फेक्शन ला घाबरू नये तथापी दक्षता घ्यावी असे आवाहन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

  नंदूरबार : फंगल इन्फेक्शनचे पेशंट रोज वाढत असतांनाच त्यावर रामबाण उपाय ठरलेले अँम्फूटेरीसीन इंजेक्शन मात्र मोजक्या स्वरुपातच उपलब्ध आहे. या इंजेक्‍शनचा पूर्ण नाशिक विभागात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने रेमडेसिविर प्रमाणेच अँम्फूटेरीसीन ईन्जेक्शनचा बाजार तापणार; असा सूर वैद्यकीय क्षेत्रातून उमटू लागला आहे.
  याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने रेमदेसिविर प्रमाणेच या इंजेक्शनची सुद्धा पर्यायी सोय तातडीने करणे तसेच त्याचा काळाबाजार होऊ नये म्हणून औषध विक्रेत्यांना आतापासूनच त्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता ठेवण्याविषयी सूचना देणे आवश्यक बनले आहे. डायबिटीस असलेल्या सगळ्या कोविड रुग्णांनी फंगल इन्फेक्शन ला घाबरू नये तथापी दक्षता घ्यावी असे आवाहन तज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

  कोरोना उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णाला कालांतराने होणाऱ्या बुरशी आजाराचे नंदुरबार जिल्ह्यात शंभरहून अधिक रुग्ण असल्याची माहिती उपचार देणाऱ्या डॉक्टरांकडून मिळाली आहे. कान नाक घसा स्पेशलिस्ट आणि दातांचे डॉक्टर असं सांगू लागलेत. ज्यांना डायबिटीज आहे असे काही कोविड बाधित रूग्ण बरे होऊन परतल्यानंतर त्यांना नाकात सायनस तर डोळयाच्या सभोवतालच्या भागात (बुरशीजन्य) इन्फेक्शन होण्याचे प्रमाण आढळले आहे. त्यालाच म्युकरमायकोसीस म्हणतात.याला फंगल इन्फेक्शनही म्हणतात. डोळा व मेंदुमधील सायनसमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्यास चेहऱ्याची एक बाजू दुखणे डोळे दुखणे डोके दुखणे नंतर दात दुखणे असे क्रमाने सुरु होते. पुढे धोकादायक आजारात रूपांतर होते म्हणून हे इन्फेक्शन कोरोना इतकेच धोकेदायक मानले जाते. यावरचा उपचारही महागडा आहे.

  दरम्यान, अशा प्रकारचे इन्फेक्शन झालेल्या एका ६२ वर्षीय आजीबाईवर येथील भगवती हॉस्पिटलचे डॉ.राजेश कोळी यांनी अत्याधुनिक एन्डोस्कोपीने फंगल इन्फेक्शन काढून नुकतीच यशस्वी शस्त्रक्रीया केली. वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास धोका टळू शकतो असा दावा त्यांनी केला आहे. आजीबाईंचा डोळा वाचविण्यास डॉ.राजेश कोळी यांना यश आले. अशा रुग्णांवर कमीत कमी खर्चात नंदुरबार येथील भगवती कान नाक घसा हास्पिटल व एन्डोस्कोपी सेंटर या रूग्णालयात उपचार दिले जात आहेत.

  भगवती हॉस्पिटलचे डॉ.राजेश कोळी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ज्यांना डायबिटीस आहे ते कोरोनातून बरे होणारे रुग्ण या आजाराला बळी पडल्याचे दिसून आले आहे. यावरील उपचारासाठी एका रूग्णास रोज ६ ते ७ इंज्क्शनची आवश्कता असते. सदर इंजेक्शन ४ ते ७ हजार रूपयाला मिळते. परिणामी शस्त्रक्रियेनंतर प्रतिदिन ४० ते ५० हजार रूपयांचा खर्च येतो, असेही डॉ.कोळी यांनी सांगितले.

  एका बाजूस तीव्र डोकेदुखी, डोळयाच्या सभोवतालच्या भागात वेदना, गालाच्या व नाकाच्या भागात वेदना होवून बधीरपणा येणे, दातदुखी व हिरडयांना ठणक येणे ही लक्षणे यात दिसतात. दुर्लक्ष केल्यास डोळे व मेंदुमध्ये प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. म्हणून वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे, असेही, डॉ.राजेश कोळी म्हणाले.