corona vaccination

कोरोना लसीबाबत(corona vaccine) सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याच्या किमतीबाबत लोकांमध्ये कुतूहल आहे. अशातच नंदूरबार पालिकेने(nandurbar corporation) महत्वाचा निर्णय घेतला आहे.

नंदूरबार : कोरोना लसीबाबत(corona vaccine) सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्याच्या किमतीबाबत लोकांमध्ये कुतूहल आहे. अशातच नंदूरबार पालिकेने(nandurbar corporation) महत्वाचा निर्णय घेतला आहे. नंदूरबार शहरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दारिद्य रेषेखालील नागरिकांची संख्या ३० हजार आहे. त्यांच्या लसीचा खर्च पालिका करणार आहे.   असा निर्णय घेणारी नंदूरबार महापालिका ही राज्यातील पहिली पालिका असल्याचा दावा शिवसेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे.

याआधी राज्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. केंद्र सरकारकडे तसा आग्रह केला जाणार होता. पण त्याआधी नंदुरबार पालिकेने तसा निर्णय घेत बाजी मारली आहे.