नंदुरबार रेल्वे मार्ग बनला जीवघेणा! पुन्हा धावत्या रेल्वेखाली चिरडून रेल्वे कर्मचार्‍याचा मृत्यू

जळगाव उधना रेल्वेमार्गावर खांडबारा ता.नवापूर येथील रेल्वे स्थानका अंतर्गत नेहमीप्रमाणे रेल्वे कर्मचारी रुळावर काम करीत होते. हे काम चालू असताना आज दिनांक २८ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजता हापा विलास पुर ट्रेन (नंबर ०९२३९) अचानक समोर आली. तेव्हा जीव वाचवून पळतांना रेलवे ट्रॅकमन ईसरीया जिवल्या धावत्या रेल्वेखाली सापडून जागीच मरण पावले.

    नंदूरबार : रेल्वे ट्रॅक वर काम करतांना अचानक समोरून रेल्वे आल्यामुळे त्याखाली चिरडून एक रेल्वे कर्मचारी जागीच मरण पावला तर दुसऱ्याचे पाय कापले गेले. नवापुर तालुक्यात खांडबारा रेल्वे स्थानकानजीक आज सकाळी ही दुर्घटना घडली.
    जळगाव ऊधना रेल्वे मार्ग रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठला आहे काय असा प्रश्न यामुळे केला जात आहे. करण आठवडाभरापूर्वीच नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडतांना मालगाडी खाली सापडून एक रेल्वे कर्मचारी मरण पावला होता. नंतर याच मार्गावर नरडाणा स्थानका अंतर्गत का रेल्वे कर्मचार्‍याचा असाच मृत्यू झाला. पाठोपाठ ही दुर्घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव उधना रेल्वेमार्गावर खांडबारा ता.नवापूर येथील रेल्वे स्थानका अंतर्गत नेहमीप्रमाणे रेल्वे कर्मचारी रुळावर काम करीत होते. हे काम चालू असताना आज दिनांक २८ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजता हापा विलास पुर ट्रेन (नंबर ०९२३९) अचानक समोर आली. तेव्हा जीव वाचवून पळतांना रेलवे ट्रॅकमन ईसरीया जिवल्या धावत्या रेल्वेखाली सापडून जागीच मरण पावले. तर दुसरे कर्मचारी रंजीत यांचे पाय कापले गेले. दोन्हीही खांडबारा रेलवे गँग नंबर २ चे हे कर्मचारी आहेत. ऐन होलिकोत्सवा प्रसंगी ही दुःखद घटना घडल्यामुळे खांडबारा परिसरात शोककळा पसरली आहे.