नंदूरबार जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला, जिल्ह्याची वाटचाल पुन्हा रेड झोनकडे

  • महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यापासूनच ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या नंदुरबार मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. परंतु महिन्यानंतर परदेशी अटकलेले मायदेशी परतले आणि त्यांच्या मुळे कोरोनाचा प्रसार झाला. परंतु हा प्रसार झपाट्याने झाला आणि कोरोनाने नंदूरबार जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सपशेल फेल ठरवले आहे. ग्रीन झोन मध्ये अव्वल असणाऱ्या नंदूरबार जिल्हा आता डेंजर झोनकडे वाटचाल करत आहे.

नंदूरबार – जगभरात कोरोनाने थैमान घालायला चालु केले तेव्हाच भारतात २२ मार्च रोजी लॉकडाऊन केला. कोरोनाला आळा घालण्याच्या दृष्टीने सर्वत्र संचारबंदी लागू केली. त्यामुळे कोरोनामुळे उद्भवणारी भयाण परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. सुरुवातीपासूनच नंदूरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये अव्वल होते. लॉकडाऊनच्या सुरुवातीला १ महिना नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव नव्हता. परंतु परदेशी पाहुण्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. आता कोरोनाचा प्रकोप एवढा वाढला आहे की सर्व उपाययोजना कूचकामी झाल्या आहेत.(Nandurbar corona update)

महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्यापासूनच ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या नंदुरबार मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण  नव्हता. परंतु महिन्यानंतर परदेशी अटकलेले मायदेशी परतले आणि त्यांच्या मुळे कोरोनाचा प्रसार झाला. परंतु हा प्रसार झपाट्याने झाला आणि कोरोनाने नंदूरबार जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सपशेल फेल ठरवले आहे. ग्रीन झोन मध्ये अव्वल असणाऱ्या नंदूरबार जिल्हा आता डेंजर झोनकडे वाटचाल करत आहे. 

आज १२जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात १ दिवसीय संचार बंदी लागू केलेली आहे. कोरोनाची साखळी तुटली नसल्याने शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.