लग्नानंतर पैसे दागिने घेऊन पाळणाऱ्या सोनू शिंदेच्या टोळीला अटक ; तब्बल १३ जणांची केली फसवणूक

सोनू शिंदे आणि तिच्या टोळीने आतापर्यंत खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक लोकांशी लग्न करून पैसे लूटले आहे. पोलिसांनी त्यांना पकडून जिल्ह्यातील आणखी तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बळी पडण्यापासून वाचले आहेत.

    नंदुरबार: खांदेशामध्ये मागील काही महिन्यापासून सोनू शिंदे नावाच्या तरुणीने धुमाकूळ घातला आहे. या तरुणीने आतापर्यत १३ तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत त्यांची फसवणूक केली आहे. तर झाले असे की सोनू नावाची तरुणी अनके तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळयात अडवत त्यांच्याशी रीती रिवाजाप्रमाणे लग्न करत असे. मात्र लग्नाचे सर्व विधी होताच सर्व दागिने व पॆसे घेऊन सोनू धूम ठोकत होती. अशाप्रकारे अनेक तरुणांची फसवणूक तिने केली, परंतु आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काही कुटूंबानी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दाखल आरोपीचा शोध घेत फसवणूक करणाऱ्या सोनू शिंदेसह तिच्या टोळीला अटक करून घेतली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू शिंदे आणि तिची टोळी ही हिंगोली आणि अकोल्याती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही टोळी वेगवेगळ्या शहरांमधील दलालांमार्फत वेगवेगळ्या तरुणांशी लग्न करण्यासाठी मदत घेते. यावेळी त्यांनी नंदुरबारमधील एका कुटुंबाला अडकवले आणि यामध्ये सोनू शिंदेला औरंगाबादमधील एका दलालाने मदत केली. सोनू शिंदे आणि तिच्या टोळीने आतापर्यंत खान्देशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक लोकांशी लग्न करून पैसे लूटले आहे. पोलिसांनी त्यांना पकडून जिल्ह्यातील आणखी तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बळी पडण्यापासून वाचले आहेत.