रुग्णवाहिकेच्या कमतेरतेमुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांना मनस्ताप

  • तालुक्यातील दोन ग्रामीण आणि १० प्राथमिक आरोग्य केद्रांना एक एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णवाहिकांचे प्रमाण वाढते असायला हवे होते परंतु एक रुग्ण वाहिका असल्यामुळे ग्रामीण रुग्णाला प्राथमिक सेवा देण्यासाठी खुप वेळ लागत आहे. एकच रुग्ण वाहिका असल्याने गावातील कोरोनाबाधितांना एकसाथच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

शहादा – नंदूरबारमधील शहादा मोहिदास्थित क्वारंटाईन सेंटरसाठी प्रशासनाने स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यांमुळे तेथील नागरीकांची कोरोनाबाधित रुग्णाची आणि वैद्यकीय अधिकार्यांची चांगलीच तारांबळ झालेली आहे. यामुळे त्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. एखाद्या अपात्कालीन वेळेतही मोठी अडचण निर्माण होते. 

तालुक्यातील दोन ग्रामीण आणि १० प्राथमिक आरोग्य केद्रांना एक एक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णवाहिकांचे प्रमाण वाढते असायला हवे होते परंतु एक रुग्ण वाहिका असल्यामुळे ग्रामीण रुग्णाला प्राथमिक सेवा देण्यासाठी खुप वेळ लागत आहे. एकच रुग्ण वाहिका असल्याने गावातील कोरोनाबाधितांना एकसाथच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.