एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी खान्देशात मजबूत होईल, गृहमंत्री अनिल देशमुखांचा विरोधकांना टोला

महाविकास आघाडी सरकार भक्कम आणि मजबूत आहे. पुढील पाच वर्षाचा कार्यकाळ सरकार पडणार नाही. राज्यातील काही नेत्यांचे भाकित होते की, सरकार नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडेल. परंतु ह्या सगळ्या अफवा आहेत. तसेच कार्यकर्त्यांना पक्ष वाढीच्या कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (EknaTh Khadse) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाना राष्ट्रवादी खान्देशमध्ये मजबूत होईल असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी म्हटले आहे. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस खान्देशमध्ये मोठी मजल मारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे एका मंदिराच्या पूजनाच्या कर्याक्रमाला उपस्थित होते. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार भक्कम आणि मजबूत आहे. पुढील पाच वर्षाचा कार्यकाळ सरकार पडणार नाही. राज्यातील काही नेत्यांचे भाकित होते की, सरकार नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पडेल. परंतु ह्या सगळ्या अफवा आहेत. तसेच कार्यकर्त्यांना पक्ष वाढीच्या कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

मंदिराच्या पुजनासाठी ठाकरे आणि पवारांची परवानगी घेतली का?

अनिल देशमुख आज एका मंदिराचे भूमिपूजन करत आहेत, ही बाब अभिनंदनीय आणि स्वागतार्हच आहे. पण आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतलीत का ? कारण ‘काहींना वाटतं की मंदिर बांधल्याने कोरोना जाईल !’ आणि ‘ई भूमिपूजन’ करावे अशी या आपल्या नेत्यांची अनुक्रमे मते आहेत’, असे ट्विट तुषार भोसले यांनी केले आहे.

तसेच या ‘गृहमंत्री अनिल देशमुख तुम्ही एका मंदिराचे भूमिपजन करणार आहेत. पण त्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी घेतली आहे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.