Violent fighting between two groups over recitation of Namaz; Six people were injured

    नंदूरबार : लॉकडाऊनच्या काळात मशिदीत गर्दी करू नका, म्हणत नमाज पठण करण्यापासून रोखल्याने दोन मुस्लीम गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडली.

    लोखंडी रॉड, लाकडी दांडके, आणि हॉकी स्टिकने दोन्हा गटांनी एकमेकांवर हल्ला केला. या हाणामारीत सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

    याप्रकरणी दोन्ही गटांनी नंदूरबार शहर पोलिसात एकमेकांविरूद्ध फिर्यात दाखल केली असून 12 जणांना अटक केली आहे, अन्य 9 जणांचा शोध सुरू आहे.