खानदेशातील मजूरांनी पुन्हा धरली गुजरातची वाट

  • खानदेशात कोणतेही काम न मिळाल्याने हजारो कामगारांनी पुन्हा गुजरातच्या दिशेने परतीची वाट धरली आहे. तिकडे जाऊन आपआपल्या कामधंद्यावर रुजु होत आहेत. खानदेश हा प्रामुख्याने शेतीखालील जिल्हे आहेत.

नंदुरबार – कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला कोरोनाला रोखण्यासाठी २२ मार्च रोजी देशात लॉकडाऊन जहीर केला. त्यावेळी सर्व उद्योगधंदे ठप्प झाले. रोजगार नसल्याने उपासमार चालु झाली. त्यामुळे खानदेशातील गुजरातमधील कामगार पुन्हा आपल्या राज्यात परतले. कोरोनाचा प्रकोप पाहता आपल्याच गावात काहीतरी कांमधंदा करु असे खानदेशी मजुरांनी ठरवले होते. 

परंतु खानदेशात कोणतेही काम न मिळाल्याने हजारो कामगारांनी पुन्हा गुजरातच्या दिशेने परतीची वाट धरली आहे. तिकडे जाऊन आपआपल्या कामधंद्यावर रुजु होत आहेत. खानदेश हा प्रामुख्याने शेतीखालील जिल्हे आहेत. त्यामुळे शिक्षण घेऊन झालेले तरुण देखील बेरोजगार आहेत. अशा परिस्थितीत हे तरुण रोजगाराच्या आशेपोटी गुजरातच्या दिशेने स्थलांतर करतात. आणि काही लोकांना राज्यातच लाहान सहान नेकरी भेटे. खानदेशातील अनेक तरुण गुजरातच्या सुरत आणि सुरत मधील शहरात स्थिरावल्या आहेत.