172 कोविड रुग्णालये आजपासून बंद; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रणात आण्यात यश

कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली असून सरकारी यंत्रणा रुग्ण सांभाळण्यास सक्षम असल्याचे सांगत नाशिकमधील 172 कोविड रुग्णालये बंद करणार असल्याचे पत्र हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे कळविले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रणात आण्यासाठी रुग्णांची सेवा केली व मृत्यूदर कमी राखण्यातही यश आले असून सद्यस्थिती आटोक्यात असल्यामुळे रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आली असून सरकारी यंत्रणा रुग्ण सांभाळण्यास सक्षम असल्याचे सांगत नाशिकमधील 172 कोविड रुग्णालये बंद करणार असल्याचे पत्र हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे कळविले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रणात आण्यासाठी रुग्णांची सेवा केली व मृत्यूदर कमी राखण्यातही यश आले असून सद्यस्थिती आटोक्यात असल्यामुळे रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    कोरोनाकाळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रकमा उकळण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे अनेक रुग्णालये चौकशीच्या फेऱ्यातही अडकली. रुग्णांची आर्थिक लूट केल्याचेही आरोप सातत्याने होत होते. यामुळेच या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.

    नाशिक महापालिकेच्या सोमवारी झालेल्या महासभेत रोशन घाटे मृत्यूप्रकरणी मानवता क्युरी रुग्णालयाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समितीची महापौरांनी घोषणा केली होती. ही समिती या सर्व प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे.